लोहारा/प्रतिनिधी

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ब्रम्हकुमारी सरिता बहणजी, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कुलमधिल प्री प्रायमरी वर्गातील विद्यार्थ्यांनी राधे राधे राधे, वो किशणा है, राधा हि बावरी हरीची अशा गीतावर बहारदार नृत्य सादर केले. यावेळी सर्व विद्यार्थी राधा व कृष्णा यांच्या सुंदर वेशभूषेत आल्याने सर्व पालकांचे मन वेधून घेत होते.त्यानंतर महिला शिक्षिका व माता पालकांनी कृष्णाचा पाळणा  गायला आणि विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात हाथी घोडा पालखी - जय कन्हैय्या लालकी अशा घोषणा देत गोविंदांनी दहीहंडी फोडली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले तर आभार मिस संचिता बाचपल्ले यांनी मानले. या कार्यक्रमास मयुरी नारायनकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, मीरा माने,शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, दीप्ती शिरसागर  यांच्यासह माता, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top