परंडा / प्रतिनिधी - 

परंडा तालुक्यातील काळेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याचे कोळेवाडी ग्रामस्थांचे हे २३ वे वर्ष आहे.

दिनांक १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.   यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तन सेवा श्रवण करायला मिळाली तर दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. परमेश्वर महाराज खोसे गिरवली यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन संपन्न झाले व त्यानंतर सर्व भावीक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तर या अखंड हरिनाम सप्ताहात व्यासपीठ चालकाची जबाबदारी ह.भ.प. आबासाहेब देशमुख शेळगावकर यांनी पार पाडली.या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त गावकरी मंडळ कोळेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.


 
Top