उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्रावणमास  म्हणल की चाहूल लागते ती आपल्या संस्कृतीत असलेल्या आणि आपण रिजवलेल्या निरनिराळ्या सणांची त्यात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी त्याच सणाचे एैचित्य साधून सोमवंशी क्षत्रिय कासार महिला मंडळाच्या  वतीने ४ऑगस्ट २०२२ रोजी जत्रा फक्शन हॉल येथे आयोजित केला होता एक पारंपरिक असा कार्यक्रम “श्रावणसरी” त्या मध्ये महिलांसाठी भरपूर खेळ,विविध पारंपरिक गाण्याचे नृत्य आविष्कार, तेजस्विनी महिला मंडळचे मंगळागौर सादरीकरण आणि स्वप्नविहार ग्रूप ने पण उत्क्रुष्ट नृत्य सादर केले त्याच बरोबर काही मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  सौ.प्रेमाताई पाटील, सौ.रचना मैदर्गि तसेच धाराशिव कासार समाजाला पालक म्हणून लाभलेले श्री.राजकुमार जगधने आणि अंजलीताई जगधने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्थाविक कासार  समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलताताई अन्दुरे यांनी केले,सूत्रसंचालन सौ.प्रीती जगधने आणि धनश्री कोळपे-कोकीळ यांनी केले. आभार दीपा मैदर्गि यांनी मानले.या कार्यक्रमासाठी तुळजापूरहून ही बऱ्याच महिला उपस्थित होत्या.


 
Top