तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील  क्रांती तरुण मंडळा तर्फे इंडियन आर्मीच्या मायनस  डिग्री असलेल्या  लेह लडाख येथे देशाचे रक्षण करणाऱ्या र्थी इफ्रेंट्री   युनिटच्या जवानांना राखी पोर्णिमे दिनी  रक्षाबंधन साजरे करण्यासाठी  राख्यांचा  गिफ्ट बॉक्स  सैनिक फेडरेशनच्या पदाधिकारीं यांना देण्यात आल्या. सैनिक फेडरेशन ने या राख्या या युनिट च्या जवानांनापोहचविण्याची  ग्वाही दिली.

   येथील  क्रांती तरुण मंडळ  तुळजापूर तर्फे   राखी गिफ्ट बॉक्स सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष तुळजापूर श्री दत्ता नवगिरे ,मेजर विठ्ठल लोखंडे ,तालुका संघटक दादा खाबोले यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे यांनी हे राखी गिफ्ट बॉक्स सहिसलामत आपल्या जवानांपर्यंत पोहोचवू अशी खात्री देऊन क्रांती मंडळाचे अध्यक्ष मुरली जगताप यांचे आभार मानले. यावेळी क्रांती मंडळाचे सदस्य समाधान गाटे,परिक्षीत पाटील,राजू पाटील,भूषण पाटील,कुंदन काळे, अक्षय नाईकवाडी,पिंटू जगताप ,शंभू वाघमारे,रवी भोसले,नाना चव्हाण असे अनेक सभासद उपस्थित होते.


 
Top