उमरगा/ प्रतिनिधी - 

उमरगा  तालुक्यात पाच पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून चार ग्रामपंचायतीचा ३२ सदस्य निवडीसाठी ७० उमेदवार रिंगणात होते. गुरूवारी (दि ०४) झालेल्या मतदान प्रक्रियेत ७५.११ टक्के मतदान झाले होते शुक्रवारी (दि ०५) तहसील कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता मतमोजणी सुरुवात झाली. दरम्यान तुगाव, कसगी, कोरेगाववाडी ग्रामपंचायतीत शिवसेना व शिवसेना-भाजप पुरस्कृत आघाडीने विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.

तालुक्यातील तुगाव ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांसाठी ३० उमेदवार चार हजार ६२९ पैकी तीन हजार २३२ मतदारानी मतदान केले होते. प्रभाग एक सुभाष चव्हाण, समाबाई चव्हाण, अंबुबाई दूधभाते विजयी झाले. प्रभाग दोन मोहन शिंदे, व्यंकट कांबळे व शामल चव्हाण. प्रभाग तीन गीता माने, रेहनाबी जमादार व दीपक जोमदे. प्रभाग चार गणेश माने, आशाबाई माने तर प्रभाग पाच सुमिता शिंदे, संजय बिराजदार हे १३ सदस्य विजयी झाले. कसगी ग्रामपंचायत ११ सदस्य निवडीसाठी २३ उमेदवारांना तीन हजार १२८ मतदान झाले होते. प्रभाग एक मल्लिनाथ बोरूटे, सावित्री पुजारी, शारदाबाई अलगुडे. प्रभाग दोन नागराबाई गावडे, चंद्रकला मुलगे, धनराज जगदाळे. प्रभाग तीनमध्ये शिवाजी यमगर, सविता माशाळे (बिनविरोध). प्रभाग चार हणमंत गुरव, राणी कोळी. प्रभाग पाच सायबा सोनकांबळे, उस्मान मुल्ला, शुभांगी गायकवाड (बिनविरोध) ११ सदस्य विजयी झाले असून दोन सदस्य बिनविरोध आहेत. कोरेगाववाडी ग्रामपंचायत एकूण नऊ जागेपैकी एक जागा रिक्त असून आठ सदस्यांसाठी १५ उमेदवारांना ६८४ मतदारांनी मतदान केले होते. प्रभाग एक विजयकुमार पाटील, सुकूमार महानुर प्रभाग दोन व्यंकट माने, महानंदा महानुर, पार्वती करनुरे तर प्रभाग तीन अनंत लवटे, सुनीता बाचके, मुद्रिकाबाई शेंडगे हे आठ सदस्य विजयी झाले आहेत. कोरेगाव ग्रामपंचायत च्या सात जागेपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून प्रभाग एक पांडुरंग खटके विजयी झाले असून गिरीजाबाई बंडगर, राजश्री सूर्यवंशी (बिनविरोध). प्रभाग दोन सुनीता इंगळे, गोपाळ मोरे (बिनविरोध). प्रभाग तीन उषा इंगळे व अलका सूर्यवंशी (बिनविरोध) झाले आहेत. तालुक्यातील अंबरनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून बिनविरोध सदस्य प्रभाग एक किसन जाधव, सुहासिनी चव्हाण, धानू बाई जाधव. प्रभाग दोन घेनू पवार, शिवाजी पवार, कमल जाधव. प्रभाग तीन गोपाळ चव्हाण, सुरताबाई राठोड अन अनिता राठोड एकूण नऊ सदस्य बिनविरोध आले आहेत. शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर शिवसेना, भाजप पक्षाचे वतीने विजेत्या उमेदवारांचा सत्कार करण्यात येत होता. तर चार ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून गुलाल उधळून हलगीच्या तालावर विजय उमेदवार व कार्यकर्ते जल्लोष करीत होते. निवडणूक प्रक्रीया यशस्वी होण्यास तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रतन काजळे, निवडणूक अधिकारी के बी भांगे, व्ही एस घुमे, एन आर पवार, बी सी रेड्डी, विकास स्वामी, संदीप सरपे यांनी परिश्रम घेत. चार ग्रामपंचायतच्या मतमोजणी दरम्यान पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 
Top