उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम तसेच ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ योजनेच्या अनुषंगाने ढोकी पोलीस ठाणे व तेरणा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ढोकी पोलीसांनी  तेरणा प्रशाला, गिरजाई शाळा, स्नेहलता विद्यालय- ढोकी, लालबहादुर शास्त्री विद्यालय- खेड  अशा शाळांत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 यावेळी विद्यार्थ्यांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ संबंधाने ‘हर घर तिरंगा’ योजनेची माहिती देउन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ योजना, कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पुरुष व महिला पोलीस अंमलदारांनी विद्यार्थी वर्गाशी पोलीसांनी संवाद साधला. विद्यालय परिसरातील छेडछाडीस आळा घालण्यासाठी पोलीस काका व पोलीस दिदी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करुन लैंगीक छळा संबंधीच्या भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमातील तरतुदींसोबतच गुड टच-बॅड टच, डायल 112 मदत वाहिनी, इत्यांदीसह समाज माध्यमांतील गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.


 
Top