लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथील वि.का.से.सोसायटी 13 जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला आहे. 

अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी  सय्यद हिप्परगा येथील माजी सरपंच नागनाथ पाटील व शिवसेना नेते अजमेर कारभारी यांच्या नेतृत्वाखाली लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन हलक्या च्या वाद्यात भव्य मिरवणूक काढुन 13 जागांसाठी संचालक पदासाठी नागनाथ पाटील,चॉंद कारभारी, शिवशंकर ओवांडे, शिवशंकर ओवांडे, शिवलिंग ओवांडे,बब्रुवान वाकडे, राम गाडवे, शिवाजी बिराजदार, महादेव तेली, बाळु जाधव, प्रभाकर बिराजदार,लालुबाई गवारे, सरुबाई गाडे, पांडुरंग हिरवे,यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज दाखल केले.यावेळी फाटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन माळी यांनी काम पाहिले.या सोसायटीच्या निवडणूकी साठी 13 जागांसाठी 13 अर्ज दाखल झाल्याने हि निवड बिनविरोध होणार जवळपास निश्चित झाले आहे.फक्त घोषणा बाकी आहे.यावेळी नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top