उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास या प्रवर्गातील लाभार्थीना सेस अंतर्गत शेळी आणि बोकड पुरविण्यात येणार आहे.तसेच मतिमंद व्यक्तीना आर्थिक सहाय्य आणि अतितीव्र दिव्यांगाच्या पालकांना अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.

 या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे दि. २० सप्टेंबर २०२२ या मुदतीत पाठवावेत, असे अवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.

 जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील २० टक्के सेस योजनेअंतर्गत  आणि पाच टक्के दिव्यांग सेस अंतर्गत २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता समाज कल्याण विभागामार्फत या योजना राबविण्यात येत आहेत.

 

 
Top