उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील अनसुर्डा येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. माजी सरपंच अरुण माने यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 कृषी विभाग आत्मा व येडेश्वरी औद्योगिक सहकारी संस्था उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतीशाळेत तालुका आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. नागेश उगलमुगले  यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, गोगलगायीचे नियंत्रण कसे करावे, मूलद्रव्याचा वापर कसा करावा, एकात्मिक कीड व्यवस्थापन, रुंद वरंबा, बीबीएफ पेरणी पद्धतीचे फायदे, खताचे व्यवस्थापन, पीक संरक्षण, सोयाबीन पिकावरील प्रमुख रोग, पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक श्री. सचिन सोनवणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तर श्री.देशमुख यांनी जैविक कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जीवनराव देशमुख, अतुल भुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येडेश्वरी औद्योगिक सहकारी संस्थेचे प्रतिनिधी श्री चैतन्य गुंड केले. स्मार्ट प्रकल्पाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. शेतीशाळेला अनसुर्डा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top