उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथे अनोळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे हा दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३.१५ वा. तुळजापुर ते उस्मानाबाद जाणा-या रोडच्या पुर्वेस आजु पापामीया आत्तार यांच्या किराणा दुकानासमोर बेशुध्द अवस्थेत आढळुन आला होता. औषधोपचारासाठी तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यास वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.         

  आनोळखी मयत पुरुष जातीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे,उंची 165 सेमी,शरीर बांधा सडपातळ,रंग सावळा,दाढी पाढरी, डोक्यावरील केस काळे कुरुळे,अंगावर पिळ्या रंगाचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची नाईट पॅंट असा आहे. तरी संबंधित वर्णनाच्या मयत इसमा बद्दल माहिती प्राप्त होताच तुळजापूर पोलीस स्टेशन ला अवगत करावे असे आवाहन पो.ना ए.व्ही साळुखे यांनी केले आहे.


 
Top