तुळजापूर/प्रतिनिधी 

 तालुक्यातील  सिंदफळ येथे स्थित श्रीमुदगुलेश्वर शंभूमहादेव  मंदीरात  श्रावणमासा निमित्ताने  रांगोळी कलाकार सुप्रिया सुरेश बडोदकर  हिने आपल्या रांगोळीच्या कलाकारीतून  श्रीमहाकालेश्वरांची नेञदिपक भव्य दिव्य अशी  प्रतिमा साकारली 

 रांगोळी कलाकार  सुप्रिया बडोदकर हिने  श्रीमहाकालेश्वरांची दहा बाय बारा फुट आकारात प्रोट्रेट रांगोळी प्रतिमा     साकारली . कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर  श्रावण मासात येथील अतिप्राचीन अशा श्रीमुदगुलेश्वर शंभू महादेव मंदीरात श्रावण मासात  मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती .  साकारलेल्या रांगोळीच्या प्रतिमेकडे सर्व भाविकांचे लक्ष वेधले जात होते.


 
Top