तुळजापूर / प्रतिनिधी-

देश व राज्यात  केंद्र सरकारच्या दबावाखाली केंद्रीय तपास यंत्रणा ईडी काम करत असून विरोधी पक्षाचे प्रमुख  पदाधिकारी,लोकप्रतिनिधी   यांना विनाकारण केंद्र लक्ष करुन त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या कुटुंबाला मानसिक ञास  देत आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने  तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपती मुरम यांना निवेदन देऊन या प्रकरणांमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.व दम्यान आजपर्यत ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थत घोषणा देवुन  तहसिल कार्यालय दणाणुन सोडण्यात आला.

निवेदन देताना  गोकुळ  शिंदे , धैर्यशील  नवगिरे,  धनंजय पाटील, खंडोजी जाधव ,  बबन गावडे,  सुरेश पाटील,  दहीवडीकर,   अमर चोपदार, दुर्गेश साळुंखे , सचिन कदम, संदीप गंगणे, शरद जगदाळे,  तौफिक शेख , मकसूद भाई शेख, समर्थ पैलवान ,भैरू लांडगे , गोविंद देवकर , तानाजी  सावंत , शिवाजी सावंत आदी उपस्थिती होती. 

 
Top