परंडा / प्रतिनिधी - 

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील भवानीशंकर मंदिर येथे १५.०० लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

    हे मंदिर पुरातन काळातील असुन हे मंदिर  जुने असल्याने मंदिराचा काही भाग हा जिर्ण झाला होता. यावेळी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी लक्षात घेऊन या मंदिरासाठी १५.०० लक्ष निधी देऊन मंदिरासमोर भव्य सभागृह तसेच जिर्ण झालेला भाग दुरुस्त केला. यानिमित्ताने गुरुवार दि.२५ रोजी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मंदिरातील सभागृहाचे लोकार्पण करून सह-कुटुंब भवानीशंकर मंदिरात आरती केली तसेच भाविकांना महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.

  परंडा शहरातील नागरिक व भाविकांनी आनंद व्यक्त करुन आ.सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला.  यावेळी परंडा शहरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top