परंडा / प्रतिनिधी - 

विधान सभाच्या कर्नाटकातील काँग्रेस पक्षाला पुर्ण बहुमताने विजय झाल्याने  विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीच्या वतीने पेढे वाटुन व फटाके फोडुन करण्यात आला. 

 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडुन मोठा जल्लोष करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत वाघमोडे ॲड.नुरोद्दीन चौधरी, ॲड.श्रीकांत भालेराव, रमेशसिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते रणजीत पाटील, जावेद पठाण, गनी हावरे सलीम हन्नुरे, इरफान शेख, नसीर शहाबर्फिवाले,रवींद्र सोनवणे, श्रीहरी नाईकवाडी,डॉ. अब्बास मुजावर, संतोष गायकवाड, कुणाल जाधव, आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


 
Top