धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक कार्य हे सेवारुपी यज्ञकुंड आहे या यज्ञकुंडात आपल्या सेवारुपी समिधाद्वारे भारत विकास परिषदेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीची अंमलबजावणी करून आपले राष्ट्र उद्धाराचे सामाजिक कार्य करावे असे आवहान भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठानचे प्रदेश पदाधिकारी तथा धाराशिव येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अभय शहापूरकर यांनी धाराशिव येथील मेघ मल्हार हॉल येथे आयोजित भारत विकास परिषदेच्या धाराशिव शाखेचा उद्घाटन सोहळा व नुतन कार्यकारिणी च्या पदग्रहण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी भारत विकास परिषदेचे प्रांताध्यक्ष सारंग आयाचित, प्रांत सचिव मुकेश पाठक, संघटन सचिव भूषण दाते यांच्यासह धाराशिव च्या नूतन शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन रामढवे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक पर भाषण प्रांताध्यक्ष सारंग अयाचित, मुकेश पाठक व भूषण दाते यांनी केले.
नुतन कार्यकारिणी
यावेळी धाराशिव शाखेची नूतन कार्यकारणी व पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शपथ ग्रहण केली, यामध्ये धाराशिव शाखेच्या अध्यक्षपदी धाराशिव शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन रामढवे यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार प्रशांत कावरे , अँडव्होकेट सिद्धार्थ विठ्ठलदास, सचिवपदी सुहास हिंदाणे , सहसचिव अशोक रोहिडा , कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर , संपर्कप्रमुख डॉ. दिपाली रामढवे , संस्कार प्रमुख डॉ. सोनाली दिक्षीत, पर्यावरण प्रमुख तृप्ती कठारे, सेवा विभाग प्रमुख प्रताप मायभाटे महिला सहभागीता प्रमुख धनश्री हिंदाणे आदि पदाधिकाऱ्यांनी यावेळी शपथ ग्रहण केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दिपाली रामढवे यांनी केले तर प्रास्ताविक भूषण दाते , शपथ वाचन मुकेश पाठक व आभार आभार सारंग अयाचित यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तुळशीच्या रोपट्यास पाणी घालून व भारत माता व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून , वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला व समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह रा.स्व. संघाचे जिल्हा संघचालक अँड. रवींद्र कदम , जिल्हा कार्यवाह अजय जानराव आदीसह शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी , उद्योजक आदि उपस्थित होते.
