उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत स्वराज्य महोत्सवाच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या चारचाकी वाहनांच्या तिरंगा झेंडा रॅलीचे आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपथितीत आयोजन करण्यात आले. या रॅलीस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

या रॅलींचा मार्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तेरणा चौक- सेंट्रल बिल्डींग- बार्शी नाका-डॉ.आंबेडकर चौक- शिवाजी चौक ते परत सेंट्रल बिल्डींग- तेरणा चौक- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असा होता. या तिरंगा रॅलीत एकूण ३६ चारचाकी वाहनांचा समावेश होता. यावेळी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रियदर्शनी उपासे, प्रशांत भांगे, अतुल चव्हाण, प्रसाद पवार, त्रिवेणी गालिंदे आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कर्मचारीवृंद तसेच मोटार ड्रायव्हींग स्कुलचे संचालक उपस्थित होते.


 
Top