परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.  गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्या संदर्भात शासनाचे नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे.त्याप्रमाणे तहसील कार्यालय, नगरपरिषद आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात आला. 

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेणुकादास देवणीकर हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव आणि प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, मंडल अधिकारी पवार ,प्रकल्प अधिकारी शिंदे के बी ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ विशाल जाधव, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्तात्रय मांगले आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे के बी यांनी केले. 

यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा बनसोडे हिने देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत , तेव्हा भारत सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकास तिरंगा ध्वज फडकविण्याचा अधिकार दिला आहे.त्या बदल्यात आपण त्या तिरंग्याचा सन्मान करत ध्वज फडकविणे व उतरविणे ही आपली जबाबदारी आहे.

   तहसीलदार रेणुकादास देवणीकर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र संग्रामातील अज्ञात क्रांतिकारक स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले पुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जन माणसात राहावी या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानापूर्वक  संस्मरण करण्यासाठी 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या भारतीय नागरिकास झेंडा फडकवायचा अधिकार दिला आहे.तो झेंडा दिलेल्या वेळेत फडकावीने व उतरविणे त्याचा सन्मान करणे अतिशय महत्त्वाचे आहे.दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ध्वज आपल्या घरावर लावणे बंधनकारक असेल व 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर तो सन्मानाने काढून व्यवस्थित जपून ठेवावे.कारण तिरंगा हा आपल्या देशाची अस्मिता आहे .दिलेली नियमावलीचे पालन तंतोतंत करावे आपल्या आजूबाजूला तिरंगा विषयी माहिती द्यावी.झेंडा कसा फडकवावा व कसा उतरवावा याविषयी सविस्तर माहिती द्यावी याच उद्देशाने शाळा महाविद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .शेवटी प्राचार्य डॉ सुनील जाधव म्हणाले की शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन विद्यार्थ्यांनी करावे व आपल्या घरी आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूला हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात माहिती द्यावी व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने, डॉ सचिन चव्हाण, महेश कसबे, महेश एकसिंगे ,जलाल मुजावर, अमोल अंगरके, बापू जाधव, दत्ता आतकर, वसंत राऊत, अरुण माने यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमानंतर शहरांमध्ये हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन तहसीलदार रेणुकादास देवणीकर, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 
Top