लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील राज मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अध्यक्षपदी राहुल विरोधे तर उपाध्यक्षपदी प्रेम लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

लोहारा शहरात राज मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सवाची बैठक हरी लोखंडे व बाळासाहेब पाटील  यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली. यावेळी राज मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोस्तवाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी विजय स्वामी, कृष्णा विरोधे, मिरवणूक प्रमुखपदी राहुल रेणके, नितीन वाघे, आकाश लोहार, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रशांत काळे, बालाजी मशालकर, सुनील देशमाने, श्रीशैल्य स्वामी, शिवा कुंभार, मुकिन पवार, सुनील ठेले, चेतक पवार, राहुल जाधव, अनिल ठेले, गणेश स्वामी, आकाश विरोधे, राजू भोरे, श्रीकांत तिगाडे, प्रशांत रेनके, अनिल विरोधे, सुमित महानुर, रोहित विरोधे, प्रतीक वीरोधे आदी उपस्थित होते.


 
Top