उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा समाजातील गोरगरीब कुटुंबातील होेतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना वसतिगृहाची सुविधा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन तात्काळ करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

 निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना जागेअभावी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक होतकरु गरीब व गरजू मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे अशी अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासन स्तरावरुन वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन तात्काळ करावे,  अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई लोमटे, सुजित लोमटे, बालाजी थिटे, मनोज माने, राजाभाऊ कारंडे, सुनील आदरकर, पंकज जाधव, प्रवीण थोडसरे आदी उपस्थित होते.


 
Top