उस्मानाबाद / प्रतिनिधी-

युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य विस्तारकपदी सोलापूर जिल्ह्यातील युवक नेतृत्व शरद कोळी यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, सचिव खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल उस्मानाबाद येथे धाडस संघटनेच्या वतीने कोळी यांचा   भव्य सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना शरद कोळी म्हणाले की, युवा सेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यानंतर सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. जिल्ह्यात शिवसेना आणि युवा सेनेचा विस्तार वाढवून संघटन अधिक मजबूत करणार असून 24 ऑगस्टनंतर गद्दाराना शिवसैनिक पळता भुई थोडी करतील, असेही ते म्हणाले.

 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या सत्कार समारंभापूर्वी युवा सेनेचे नूतन राज्य विस्तारक शरद कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

 यावेळी धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन जगदे, युवा अध्यक्ष राहुल सरवदे, उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले, शिवसेना पळसप विभागप्रमुख राजेंद्र तुपे, सुनील पाटील, सतीश शिंदे, अ‍ॅड.रेवण घाडगे, अ‍ॅड.बालाजी सर्जे, विश्वंभर माने, महेश लोखंडे, सचिन माने, प्रदीप विधाते, सागर, विधाते, वैभव पाटील, आण्णासाहेब जगदे, दादा खोत, पवन कोळी, अमोल कोळी यांच्यासह शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top