उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 विशेष सहाय्य योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे केंद्रशासनामार्फत अनुदान प्राप्त होते.

सद्यस्थितीत वरील योजनांच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाचे अनुदान PFMS प्रणालीमार्फत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांची पोर्टलवर माहिती भरावयाची असल्यामुळे वरील योजनांच्या लाभार्थ्यांना आधारकार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, दारिद्रयरेषेचे प्रमाणपत्र यांची प्रत उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयात संजय गांधी  योजना  या विभागात सादर करण्यात यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.


 
Top