परंडा / प्रतिनिधी-

श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ ,परंडा संचलित कल्याणसागर माध्यमिक विद्यालय ,परांडा व सरस्वती प्राथमिक शाळा ,परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना खाऊचे वाटप करून, वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी कल्याणसागर समूहाच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी ,सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार कल्याण सागर माध्यमिक विद्यालय डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर  विद्यालयाचे मुख्याध्यापक  किरण गरड  सहशिक्षक -मुकुंद भोसले चंद्रकांत तनपुरे अजित गव्हाणे सचिन शिंदे भारत थिटे अमोल कोकाटे प्रशांत कोल्हे हरिश्चंद्र पवार गणेश पवार हे यावेळी उपस्थित होते.


 
Top