वाशी  / प्रतिनिधी-      

वाशी फाटा ते वाशी शहरामध्ये येणा-या मुख्य रस्त्यासह इतर रस्त्यांची दुरावस्था होवून रस्त्यावरील खड्डयामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेल आहे. या रस्त्यांची चार दिवसात दुरूस्ती न झाल्यास दि. २२ जुलै रोजी रस्त्यावरील खड्डयातील पाण्याचे पुजन करून पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा शहरातील विवीध दैनिकांच्या पत्रकारांनी दि. १८ जुलै रोजी दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सार्वत्रिक बांधकाम विभागाकडून एका तासात रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सूरू करण्यात आले आहे.

  वाशी फाटा ते वाशी शहरामध्ये येणा-या रस्त्यासह बसस्थानक रोड, कन्हेरी बायपास रोड, तांदुळवाडी रोड,  इंदापूर रोडवरील रस्त्याची चाळण झालेली असून रस्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दयनिय अवस्था झालेली आहे . वाशी फाटा ते वाशी शहरामध्ये येणा-या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून त्यास तलावाचे स्वरूप आलेले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत असताना  सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत होते. बांधकाम विभागाच्या अधिका-यांना जागे करण्यासाठी शहरातील विवीध दैनिकाच्या पत्रकारांनी पुढील चार दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास दि. २२ जुलै रोजी रस्त्यावरील खड्डयातील पाण्याचे पुजन करून पाण्यात बसून आंदोलन करण्याचा ईशारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अंगद शिंदे यांचेसह तहसीलदार नरसिंग जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांना निवेदनाद्वारे दि. १८ जुलै रोजी देण्यात आला होता. निवेदन बांधकाम विभागात धडकताच खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाकडून एका तासाच्या आत रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. 

दिलेल्या निवेदनावर मुकूंद चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे, शोएब  काझी, गौतम चेडे,अजय वीर  यांच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top