उस्मानाबाद / प्रतिनिधी-           

 पोलीसांच्या वेळी- अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे ध्यानात ठेउन मा. पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मुंबई येथील ‘स्पार्क्स लाईफ केअर’ या संस्थेच्या माध्यमातून दि. 18 जुलै ते 06 ऑगस्ट या काळात जिल्हाभरातील पोलीस ठाण्यात वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पेालीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृहात’ करण्यात आले. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांसह मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत व पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनी  शिबीराचा लाभ घेतला.

 शिबीरादरम्यान डोळे, रक्तदाब, हृदय गती, रक्तशर्करा, यकृत, मुत्रपिंड इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या केल्या जात असून त्याचा लाभ पोलीस व त्यांचे कुटूंबीय घेत आहेत.


 
Top