तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार (दि१८) रोजी जिल्हा परिषद प्रशालेत एसएससी परीक्षेत भरघोस गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व प्रशालेतील ४५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदन माळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी गुंड यांच्या हस्ते एसीसी परीक्षेत ९०%टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या अश्विनी ठेवले ,पूजा डोके, दीक्षा स्वामी ,प्रतीक्षा गवळी ,दत्तात्रय माळी ,शुभम कदम ,आयशा शेख ,तनवी कुलकर्णी ,या विद्यार्थ्यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले व शालेय साहित्य भेट देण्यात आली.  सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षण घेतलेल्या डॉ.सचिन नागनाथ शिंदे व डॉ. स्नेहल नागनाथ शिंदे या बहिण भावाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रबळ इच्छाशक्ती जिद्द चिकाटी मेहनतीच्या बळावर एमबीबीएस ला प्रवेश मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, यादोन्ही मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देणारे त्यांचे आई-वडील नागनाथ शिंदे ,सौ.रेखा शिंदे ,डॉ. स्नेहल शिंदे यांचा सपोनि सचिन पंडित, वैद्यकीय अधिकारी गुंड यांच्या हस्ते गौरव करून सन्मान करण्यात आला.

 यावेळी माजी सरपंच पांडुरंग माळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामराजे पाटील, प्रा .कानिफनाथ माळी, पत्रकार भैय्या कुलकर्णी, पत्रकार संतोष मगर, बालाजी फंड ,संजय रुपनर ,धर्मराज शिंदे, उमेश शिंदे ,शाहू माळी ,दयानंद गवळी ,सुनील माळी ,अमोल काळदाते, शिवसेना शाखाप्रमुख संजय कोळी, गुरुनाथ स्वामी, दत्तात्रय ठेले ,काशिनाथ डोके ,संजय बोधले ,महेश दरेकर ,अच्युत राऊत ,माजी ग्राप सदस्य रामेश्वर माळी,प्रदीप मगर, पत्रकार दादासाहेब काडगावकर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले, प्रस्ताविक चंद्रोदन माळी यांनी केले तर आभार प्रा.कानिफनाथ माळी यांनी मानले .

 
Top