तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्षा व मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .

 सन २०२१-२२ घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परिक्षेत तेर ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील इयत्ता दुसरी मधील अनुराग आण्णासाहेब अंधारे यांने २०० पैकी १९० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याचबरोबर मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत केंद्रात प्रथम तर राज्यात अकरावा क्रमांक पटकाविला तसेच इयत्ता सातवी मधील  ऋतुजा काकासाहेब कदम हिने मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला .यावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांना व्ही. आर .शेजाळ , जी. एम .यरकळ , एस. यु .देशमुख , जी. डी .चौरे ,  एल. ए. बंडगर , पी. जे .मुंढे आदि शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. आर. खडके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शन शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले.


 
Top