कळंब / प्रतिनिधी-

उपजिल्हा रूग्णालय कळंब येथे रूग्ण कल्याण समिती ची बैठक  वैद्यकीय अधिक्षक डॉ मंजुराणी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी न प चे सहकार्य घेण्याचे ठरले,

  कळंब शहरात पावसाळ्यातील साथ रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाला, सफाई व किटकनाशकांची धुरळणी वारंवार करणेसाठी न प कडे पाठपुरावा करणे,  मुख्य रस्ता ते दवाखाना प्रवेशद्वारापर्यंत रस्ता दुरुस्त करणेसाठी सा बां विभागास अवगत करणे ई. आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी डॉ मंजुराणी शेळके यांनी नुतन वैद्यकीय अधिक्षक म्हणून पदभार स्विकारल्या बधल व या महिन्यात एका दिवसात तीन-तीन सिझर च्या हॅटट्रिक सह नऊ सिझर्स करण्याचा उच्चांक केल्यामुळे. तसेच उपजिल्हा रूग्णालयास कायाकल्प व ईतर पुरस्कार मिळाल्याबद्दल रूग्ण कल्याण समिती च्या वतिने सत्कार करण्यात आला. बैठकीत डॉ सुधीर आवटे, रूग्ण कल्याण समिती सदस्य डॉ रामकृष्ण लोंढे, नगर परिषदे चे संजय हाजगुडे, आयुष चे डॉ शरद दशरथ, श्री दत्तप्रसाद हेड्डा ईत्यादी उपस्थित होते.


 
Top