उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्यासाठी रेणुका मातेची खणा नारळाची ओटी भरली व आरती करुन प्रार्थना केली.

 भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य उमाताई खापरे आणि धाराशिव जिल्हा परिषद च्या माज़ी उपाध्यक्षा,आमच्या मार्गदर्शक आदरणीय अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय स्त्री रुग्णालय येथे ज़ाऊन महिला पेशंटला फळांचे वाटप केले.त्यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्मिता सरोदे(गवळी) मॅडम व तेथील स्टाफ उपस्थित होता.

 यावेळी भाजपा महिला मोर्चा ज़िल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे ,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई माने, ओबीसी सेलच्या धाराशिव तालुकाध्यक्ष सारिकाताई कांबळे व महिला उपस्थित होत्या..


 
Top