उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पक्षप्रमुख   उद्धव  ठाकरे यांनी मुंबई येथे जाहीर आवाहन केले की, माझ्या वाढदिवसानिमित्त बुके, हार व इतर भेट वस्तु न आनता मला आपल्या सर्वांचे शपथपत्र व पक्ष सदस्य नोंदणी करून सादर करावेत. त्यांच्या या आवाहनास उस्मानाबाद तालुक्यातील शिवसैनिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन हजारो शिवसैनिकांनी साहेबांना बुके - हार न पाठवता त्यांनी लिहिलेली शपथपत्रे मातोश्रीकडे उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री कैलास बाळासाहेब घाडगे - पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सादर केली.

   याप्रसंगी उस्मानाबाद शिवसेना तालुकाप्रमुख श्री सतीश कुमार सोमानी, अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अमीर भाई शेख, उप तालुका प्रमुख सौदागर जगताप, केशेगाव विभाग प्रमुख श्री मुकेश पाटील, आंबेजवळगे विभाग प्रमुख श्री. विश्वजित सारडे, तोरंबा गणप्रमुख  नेताजी गायकवाड, चिलवडी गणप्रमुख बालाजी जाधव,  विशाल जमाले, कासाहेब शिनगारे,जगन्नाथ शिंदे, खेड सरपंच सुनिल गरड, संकेत सुर्यवंशी, श्री शिवलाल कुऱ्हाडे, दत्तात्रय जावळे, अनिल कुलकर्णी, तसेच इतर शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top