तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापुर तालुक्यातील मौजे येवती येथील शेतकऱ्यांच्या दोन म्हशी विद्युत शॉक लागल्यामुळे दगावल्या.ही घटना सोमवार दि. 25 जुलै च्या मध्यरात्री येवती शिवारात घडली. ,

सविस्तर माहिती अशी की,  मौजे येवती येथील शेतकरी हनुमंत भागवत तांबे यांच्या शेतातील गट.नंबर 219 मध्ये दोन गाभण म्हशी गावरान म्हशी मृत अवस्थेत दिसुन आल्या मयत म्हशी रात्री दावे तोडुन इलेक्ट्रीक बोर्डापाशी आल्या व रात्री 1 वाजता शेतातील थ्रीफेज विद्युत पुरवठ्याजवळ  दोन्ही म्हशी चारा खात खात आल्यावर त्याना विद्युत इलेक्टीक करंट लागल्यामुळे दोन ही गाभण म्हशी जागेवरच मरुन पडलेल्या दिसुन आल्या सदर म्हशीची अंदाजे किमंत प्रत्येकी 60 हजार रुपये आहे जवळपास शेतकऱ्यांचे एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे.मयत म्हशीचा तलाठी यांनी जागेवरच पंचा समक्ष पंचनामा केला.

 यावेळी समाधान ढोले,यशवंत बडुरे,  दादाराव गायकवाड ,बलभीम तांबे , उत्तम शिंदे उपस्थित होते.तरी प्रशासनाने या शेतकऱ्यांस आर्थिक नुकसान पर मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

 
Top