उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कारगिल युध्‍दाच्‍यावेळी भारतीय सैन्‍याने अतिशय दुर्गम उंचावरील कठिण डोंगर शिखरावर लपून बसलेल्‍या पाकिस्‍तानी सैन्‍याला हुसकावून लावले आणि आपला भूभाग पुन्‍हा ताब्‍यात घेतला. यामध्‍ये 527 सैनिक शहिद झाले. याचा देशाला अभिमान आहे. आम्‍ही त्‍यांना वंदन करतो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचा शौर्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन सुभेदार मेजर गुंडू सोनकांबळे यांनी आज  तुळजापूर येथे व्‍यक्‍त केला.

 26 जुलै हा दिवस देशभर ‘कारगिल विजय दिवस’ म्‍हणून साजरा केला जातो. त्‍यानिमित्‍ताने केंद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर आणि श्री. तुळजाभवानी सैनिक स्कूल तुळजापूरयांच्‍या संयुक्‍त विदयामाने आयोजित शहिदांना मानवंदना कार्यक्रमात श्री. सोनकांबळे बोलत होते. यावेळी व्‍यास‍पीठावर प्राचार्य श्री.वैजनाथ घोडके, कॅप्‍टनश्री. सिराज खान, क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री.अंकुश चव्‍हाण,डॉ. सुभाषपेठकरश्री.रमाकांत स्‍वामी, श्री. भिमा सुरवसे, श्री.रणजीत रोकडे अदि उपस्थित होते.

  श्री. सोनकांबळे यांनी भारतीय सैन्‍यांनीअतिश प्रतिकुल परिस्थितीमध्‍ये कारगिलयुध्‍द जिंकले. त्‍या  युध्‍दाचे प्रसंग उपस्थितांना सांगितले. नियंत्रण रेषेबाहेर भारतीय सैन्‍य खूप मोठे नुकसान करून शकले असते, परंतु हे युध्‍द केवळ कारगिल पुरतचे भारताने लढले आणि जिंकले. श्री. चव्‍हाण म्‍हणाले, कारगिल विजयदिनाचे स्‍मरण करताना कॅप्‍टन विक्रम बत्रा आणि त्‍यांचे तुकडीचे योगदान हे तरुणांना देशभक्‍ती आणि साहस यांचे प्रतिक शिकवते. जेव्‍हा कॅप्‍टन विक्रम बत्रा एक पर्वत शिखर जिंकून परत आले. त्‍यांनंतर त्‍यांचे वाक्‍य प्रसिध्‍द झाले ‘ये दिल मांगे मोर ---’ त्‍यांनी तरूणांमध्‍ये देशभक्‍ती आग पेटवली. पुढच्‍या हल्‍यांत त्‍यांनी प्राणांचे बलिदान दिले. या हल्‍याचे नेतृत्‍व त्‍यांनी केले होते.यासर्वशहिदांच्‍या शौर्याचे स्‍मरण करण्‍याचा हा दिवस असल्‍याचे श्री.चव्‍हाण यांनी सांगितले.

  श्री. घोडके म्‍हणाले, कारगिल विजय दिनाच्‍या निमित्‍याने घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून विदयार्थांना भारतीय सैन्‍यांनी देशासाठी केलेला पराक्रम त्‍यांचे धाडस, शौर्य, यांचे धडे पुन्‍हा मिळाले आहेत. यातूनच देशभक्‍त सैनिक तयार होतील, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

  यावेळी श्री. भिमा सुरवसेयांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला सैनिक शिस्‍तीमध्‍ये उपस्थित मान्‍यवरांचे हस्‍ते शहिदांना मानवंदना देण्‍यात आली. यावेळी सैनिकी स्‍कुलच्‍या विदयार्थांनी अतिश शिस्‍तबध्‍द मानवंदना दिली.

  यावेळी घेण्‍यात आलेल्‍या निबंध, चित्रकला आणि वक्‍तृत्‍व स्पर्धा घेण्यात  आली यामध्ये  पवन बेसिकर, शिवराज भुसरे, ओम पुजारी, अशिष बिराजदार, वैभव कांबळे, आर्यन धोतरे, सिध्‍दनाथ गायकवाड, शंकर भोसले, सार्थक वेदपाठक यांना विजेता घोषित करण्यात आले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत स्‍वामी यांनी केले, प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रम यशस्‍वी करण्यासाठी   जब्‍बार हन्‍नूरे आणि जलील हिपरगी यांनी परिश्रम घेतले.


 
Top