वाशी / प्रतिनिधी-

  येथील दत्त मंदिरामध्ये   उद्योग विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये विविध उद्योग व उद्योगांना वेगवेगळ्या योजनेमधून मिळणारे कर्ज या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या बरोबरच  उद्योगासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावर विविध योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाविषयी माहिती देण्यात आली. 

    आत्मनिर्भर भारत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत वाशी तालुका भाजपाच्या वतीने वाशी येथील दत्त मंदिरामध्ये उद्योग विषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाशीचे उपनगराध्यक्ष श्री सुरेश कवडे, उद्योगा विषयी मार्गदर्शन करणारे प्रा. किरण आवटे, अशोक जगताप, वाशीचे नगरसेवक विकास पवार,  बळवंत कवडे, श्रीकृष्ण कवडे, संतोष गायकवाड, सौ. संजना चौधरी, सौ. स्मिता गायकवाड, वाशी ग्रा. पं. चे माजी सदस्य श्री अमोल केळे,  वाशी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन श्री मुजावर एम. आय., याच बॅंकेचे संचालक श्री अनिल जगताप, गणेश उंदरे, गणेश कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या कार्यक्रमांमध्ये प्रा. किरण आवटे यांनी विविध उद्योग व या उद्योगासाठी विविध योजनांमधून मिळणारे कर्ज याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध उद्योगावर विविध योजनांमधून  मिळणारे अनुदान याविषयी  देखील माहिती दिली. नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभा करावेत व हे उद्योग नोकरीपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत किंवा या उद्योगांमधून आपण आपली  प्रगती कशी साधू शकतो या विषयी ही त्यांनी उदाहरणांसह  उपस्थितांना सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष श्री सुरेश कवडे यांनी मार्गदर्शन करताना वाशी येथील युवकांना तसेच उद्योग उभारु इच्छिणाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वाशी येथील जास्तीत जास्त लोकांनी  पार्टनरशिप, दोन -तीन जणांचा ग्रुप किंवा वैयक्तिकपणे उद्योग उभा करावेत, या मधे कसल्याही प्रकारे राजकारण न करता सर्वांना आम्ही उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कर्जापासून ते  इतर सर्व बाबींसाठी  सहकार्य करु असे ही अश्वस्त केले. यावेळी प्रा. अशोक जगताप यांनी बोलताना माझी वाशी येथील नव उद्योग उभारु इच्छिणाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियुक्ती  झालेली आहे व मी आठवड्यातून एक दिवस वाशीला उपलब्ध असणार असल्याचे असे  सांगितले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विकास पवार यांनी मानले. यावेळी शहरातील व्यापारी, युवक, शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top