उस्मानाबाद--जिल्हातील उमरगा MIDC येथील जोगेश्वरी ब्रिवरीज प्रा. लि. कंपनीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या धाडीत एकूण 45 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त  करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील उमेश शिंदे व देवेंद्र शिंदे हे या कंपनीचे संचालक आहेत. ईडीने फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. ईडीने ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. मनी लॉंड्रींग कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक असलेली फॅक्टरिची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. मनी लॉंड्रींग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील या वर्षातील दुसरी कारवाई आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातील या वर्षातील ईडीची ही दुसरी कारवाई असून यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद तालुक्यातील  जवळा(दुमाले) येथे असलेली 150 एकर जमीन व त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. . ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करीत जप्तीची कारवाई 13 एप्रिल 2022 रोजी केली होती.

 
Top