उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक सामनाचे कळंब तालुका प्रतिनिधी अशोक शिंदे यांची कन्या सिध्दी अशोक शिंदे हीने नवादेय परिक्षेत यश संपादन केले आहे. तिची तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.  

धाराशिव तालुक्यातील तडवळे येथील जि. प. कन्या आदर्श प्राथमिक शाळेत सिध्दी अशोक शिंदे ही शिक्षण घेत आहे. 30 एप्रिल रोजी नवादेय विद्यालयासाठी निवड परिक्षा झाली होती. ही परिक्षा सिध्दीने दिली होती. या परिक्षेत तिने यश संपादन केले आहे. जिल्हा तुळजापूर येथील नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश मिळणार आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 
Top