तुळजापूर / प्रतिनिधी-

 केंद्रीय कमिटीने  जिल्ह्ल्यातील  रास्त भाव दुकाने तसेच शासकीय गोडाऊन यांच्या तपासण्या करून शासनास व दुकानदारास  सूचना केल्या तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत विविध मुद्द्यावर चर्चा करून दुकानदाराच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या व सर्व सूचनाचे दिनांक 05 जुलै 2022 च्या मुंबई बैठकीत संपूर्ण रास्त भाव दुकानदारांच्या अडीअडचणी सोडविण्याची हमी दिली 

 सदर बैठकीत मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष काकासाहेब कासार व महाराष्ट्र सहसचिव प्रफुल्ल कुमार शेट्टे व उस्मानाबाद शहरातील रास्त भाव दुकानदारअमरसिंह किरदत्त व संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती चव्हाण मॅडम तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या उपस्थितीत संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा पुरवठा अधिकारी महेंद्र कुमार कांबळे साहेब व कमिटीतील सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार रास्त भाव दुकानदाराच्या संघटनेच्या वतीने करण्यात आला .सदर बैठकीचे आयोजन  पुरवठा नायब तहसीलदार राजाराम केलूरकर  व पुरवठा नायब तहसीलदार जाधव  यांचे मोलाचे सहकार्य लाभले .त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा संघटनेच्या वतीने तसेच मराठवाडा विभागाच्या वतीने आभार मानण्यात आले.


 
Top