उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन आत्मनिर्भर भारत तसेच मा.श्री.राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर उस्मानाबाद या संकल्पनेतून रवि झोंबाडे (रा.बार्शी नाका उस्मानाबाद) यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत रु.१० हजार चे कर्ज मिळाले होते. या कर्जाचा वेळेत परतावा केल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया बार्शी नाका उस्मानाबाद या बँकेच्या माध्यमातून मुद्रा योजनेतुन त्यांना रु.१ लाखाचे कर्ज मिळाले. या कर्जाच्या रक्कमेमुळे श्री झोंबाडे यांचा फळ विक्री या व्यवसायामध्ये वृध्दी झाली त्यामुळे एक कुटुंब आत्मनिर्भर झाले या बद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे साहेब व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने डॉ.चंद्रजित जाधव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अर्चना अंबुरे यांच्या हस्ते लाभार्थ्याचा सत्कार केला व पुढील व्यवसाय वृध्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या वेळी सर्व मान्यवरांनी इतर व्यवसायकांना आवाहन केले ज्यांनी विविध योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थ्यांनी वेळेत न चुकता कर्जाचा परतावा करावा जेणे करुन पुढील योजनेसाठी पात्र व्हाल.

सदरील योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी आत्मनिर्भर भारतचे जिल्हा संयोजक सचिन लोंढे, सह संयोजक सलमान शेख यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी पांडुरंग लाटे, प्रितम मुंडे, स्वप्नील नाईकवाडी, शेषेराव उंबरे, गणेश एडके, विद्या माने, सुनील पंगुडवाले, महेश बागल, रोहीत देशमुख, अमोल पेठे, पांडुरंग तावस्कर, अजय उंबरे, वैभव हंचाटे, धनराज नवले, अर्शद मुलानी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, संदिप देवकते,  इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top