तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत आठवडा बाजार परिसरातील १२४ भक्त निवास इमारत  खुले  करण्याची मागणी शहरातील नागरिक व पुजारी वृंदानी केली आहे. या बाबतीत मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 

 श्री क्षेत्र तुळजापूर शहरातील श्री देविजींचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक - भक्तांच्या निवासाची सोयी - सुविधेसाठी  तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत  शहरामध्ये विविध ठिकाणी एकुण तीन धर्मशाळा ( भक्तनिवास ) उभारण्यात आल्या आहेत . त्यातील दोन धर्मशाळा या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत . त्या सध्या भाविक - भक्तांसाठी लिलाव पध्दतीने भाविकांना उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत . परंतु नगर परिषदेच्या अंतर्गत असणारी आठवडा बाजार परिसरातील 124 भक्त निवास ही इमारत मागील ‘ अनेक वर्षांपासून भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे शुक्रवार पेठ , मंकावती गल्ली , खडकाळ गल्ली व कमानवेस या भागातील पुजाऱ्यांकडे येणारे भाविकांना धर्मशाळा ( भक्त निवास ) , पार्किंग , स्वच्छता , रोड लाईट इ . ची सोयी - सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊन हेळसांड होत आहे . त्यामुळे सदरील धर्मशाळा ( भक्त निवास ) ही तात्काळ सुरु करण्यात यावी , अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

हे निवेदन  श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव सांळुके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शहरवासिय पुजारी वृंदांनी दिले.

 
Top