कळंब / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मोहा येथील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर अॕॅग्रो इंडस्ट्रीज हा कारखाना बंद करण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने दिले आहेत. याबाबतचा आदेश वीज मंडळ व स्थानिक ग्रामपंचायतीला सुद्धा दिला असून वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले आहे.

राज्य प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याने ९ फेब्रुवारी २०२२ रोजी संमतीच्या अटींचे पालन झाले का, हे तपासण्यासाठी मोहेकर अॕॅग्रो इंडस्ट्रीजला भेट दिली होती. यावेळी सीजीडब्ल्यूए (CGWA) कडून एनओसी न घेता बोअरवेलचे भूजल तसेच टँकरद्वारे वापरले, प्रदान केलेला धूळ संग्राहक अपुरा आहे. स्टॅक व एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांटमधून गोळा केलेेले जेव्हीएसचे विश्लेषण परिणाम तपासण्यासाठी हवा व पाण्याची गुणवत्ता अनुक्रमे टीपीएम (TPM) आणि सीओडी (COD) सारख्या पॅरामीटर्सच्या संमती मर्यादेपासून उच्च बाजू दर्शवते. यामुळे उल्लंघन झाले आहे. विविध पर्यावरणीय कायद्यांच्या तरतुदी जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९४७ चे कलम ३३ ए आणि वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१ ए अन्वये, औरंगाबाद येथील मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच युनिटचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.


 
Top