उस्मानाबाद / प्रतिनिधी-

परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स या कारखान्यातून निघणारे केमिकलयुक्त पाणी शेतकर्‍यांच्या शेतातून पाझर तलावात सोडले जात असल्यामुळे जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरातील विहिरी आणि बोअरवेल्सचेही पाणी दूषित होत असल्यामुळे कारखान्याने शेतात सोडलेले केमिकलयुक्त पाणी तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा 1 ऑगस्ट रोजी शेतकर्‍यांसह उपोषण करणार असल्याचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि.21) जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख रमेश गणगे, प्रदेशाध्यक्षा सौ.रत्नमाला निकाळजे, मराठवाडा अध्यक्ष राहुल गाढवे, राज्य संघटक रमेश सल्ले, मराठवाडा संपर्कप्रमुख बळीराम तिंबोळे, मराठवाडा अल्पसंख्यांक अध्यक्ष फिरोज तांबोळी, मरावाडा उपाध्यक्ष विकास औताडे, मराठवाडा महासचिव सचिन गायकवाड, मराठवाडा कार्याध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, जिल्हा संघटक रामा भोसले, महिला जिल्हाध्यक्षा अनिता माने, परंडा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष नसीम पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गणगे, श्रीपाद कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे.


 
Top