उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील समता नगर येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे शनिवारी (दि.9) आषाढी दिंडी बरोबरच वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. यावेळी दिंडीमध्ये मुले वारकरी पोशाखात सहभागी झाले होते. सर्वप्रथम विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन स्कूलच्या संचालिका कमलताई नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुलांना भक्त पुंडलिकाची कथा सांगून आई-वडिलांची सेवा करावी हा संदेश देण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य सादर केले. या नृत्यासाठी अस्मिता शिंदे, सौ चव्हाण, भोज, आहेर यांनी मार्गदर्शन केले. बालवाडीतील लहान मुलांची वारकरी दिंडी काढण्यात आली. यासाठी सौ पाटील, वाघमारे, घोडके, बिडवे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे नियोजन सौ.शिंदे, सुहास कपाळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top