कळंब / प्रतिनिधी-

 क्षुधेलिया अन्न ! दयावे पाञ न विचारून !!

धर्म आहे वर्मा अंगी ! कळले पाहीजे प्रसंगी !!

या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे कळंब येथील स्व गणपतराव कथले युवक आघाडी च्या वतीने परतीच्या वारकर्‍यांना मोफत अन्नदान ११ जुलै रोजी बस स्थानकात  करण्याचे आयोजीले  आहे 

आषाढी वारी साठी राज्यातुन तसेच पर राज्यातुन लाखो भाविक पंढरपूर ला आपल्या विठु माऊली च्या भेटीसाठी येत असतात. त्यात काही पायी दिंडीत दर्शनासाठी जातात तर काही मिळेल त्या वाहनाने पंढरपूर मध्ये दाखल होतात. आशाच वारकरी मंडळी नंतर आषाढी झाली कि परत आपल्या गावी जातात त्यात ते पंढरपूर मध्ये कुणी तिकिटाचे पैसे वाचहुन तुळशी माळघेते तर कुणी विठ्ठलाचा फोटो त्यात त्यांना परतीचा प्रवास सुध्दा करावा लागतो म्हणून हाच हेतु डोळ्यासमोर ठेवून स्व गणपतराव कथले युवक आघाडी च्या वतीने कळंब येथील बस स्थानकात या वारकरी मंडळी ना मोफत अन्नदान करणात येणार असून सर्व वारकरी तसेच प्रवाशांनी प्रसाद घेणे साठी ११ जुलै रोजी हजर राहावे असे अहवान देखील आघाडीच्या वतीने करण्यात आले. यासाठी कथले, सुमित बलदोटा, यश खुराणा तसेच अनेक शहरातील सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत

 
Top