तुळजापूर / प्रतिनिधी-

 शिवसेनेचे बंडखोर खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबीयांसह तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी शिंदे कुटुंबीयांच्या वतीने तुळजाभवानी मातेची पंचामृत अभिषेक, साडी चोळीची पूजा बांधण्यात आली. परंतु यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक अनुपस्थित होते तर भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी, वडील, सून व नातवंडे उपस्थित होते. दर्शनानंतर मंदिर कार्यालयात मंदिर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी योगेश खरमते यांनी सत्कार केला. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे उपस्थित होते. तर भाजपच्या वतीने आमदार राणा पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सत्कार केला. यावेळी अर्चना पाटील, विशाल रोचकरी, शिवाजी बोधले, आनंद कंदले, ओम मगर उपस्थित होते.

 
Top