नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२७ जुलै रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अभियान तसेच हर घर तिरंगा च्या अनुषंगाने नळदुर्ग शहरात बालाघाट कॉलेज ते खंडोबा रोड याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व साफसफाई करण्यात आली आहे.

 मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणुन ओळखले जातात. ते सतत शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अभियान ३.० तसेच हर घर तिरंगा हे अभियान नळदुर्ग शहरात राबविण्यात येणार आहे दि.२७ जुलै रोजी या अभियानांतर्गत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत शहरातील बालाघाट कॉलेज ते खंडोबा रोड याठिकाणी नगरपालिचे सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी श्रमदान करून याठिकाणी वृक्ष लागवड करण्याबरोबरच साफसफाई देखील केली आहे. त्याचबरोबर लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

  यावेळी स्वता मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्यासह नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, नगरअभियंता वैभव चिंचोळे, स्वप्नील काळे, स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख, दीपक कांबळे, खलील शेख, मुश्ताक पटेल, विनिल चव्हाण,राजु रोमन, नागनाथ होनराव, ज्योती बचाटे, शहाजी येडगे, आण्णा जाधव, सुशांत डुकरे, सतीश काळे, तानाजी गायकवाड यांच्यासह सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 नळदुर्ग (तानाजी जाधव) नळदुर्ग येथील जि. प.प्रशाला शाळेतील दहावीच्या  १९७८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रीत येऊन शाळेत विद्यार्थी मेळावा घेतला. यावेळी त्या बॅचचे ३० विद्यार्थी--विद्यार्थिनी एकत्रीत आले होते. त्यांनी त्यावेळच्या म्हणजे ४४ वर्षांपुर्वीच्या आठवणी जागृत केल्या. हा क्षण खरोखरच सुंदर होता.

 ळदुर्गची जि.प.माध्यमिक शाळा त्याकाळात नळदुर्ग शहर व परीसरात शिक्षणाच्या बाबतीत नावाजलेली शाळा होती. त्यावेळी शहर व परीसरात दहावी पर्यंतची ही एकमेव शाळा होती. या शाळेतील त्यावेळेसचे शिक्षकही तितकेच गुणवान व फक्त चांगल्या दर्जाचे विद्यार्थी घडविण्याचेच काम करीत होते.त्याचबरोबर त्याकाळातील विद्यार्थीही शिक्षकांची आज्ञा पाळणारे होते.

       कालांतराने सर्वत्र खाजगी शाळांचे पेव फुटले आणि त्याकाळी नावाजलेली नळदुर्ग येथील जि. प.प्रशाला ही शाळा शिक्षणाच्या बाबतीत मागे पडली. या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले या शाळेत शिक्षण घेतलेले अनेकजण आज उच्च पदावर आहेत कांहीजन सेवानिवृत्त झाले आहेत.

 या शाळेतील दहावीचे १९७८ च्या बॅचचे विद्यार्थी--विद्यार्थिनी यांनी एकत्रीत येऊन शाळेत विद्यार्थी मेळावा घेतला.४४ वर्षांपुर्वीचे विद्यार्थी एकत्रीत येण्याचा योग हा फारच दुर्मिळ समजला जातो. मात्र नळदुर्गच्या जि. प्रशाला शाळेत १९७८ साली दहावीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी एकत्रीत आले. यामध्ये सुधीर वैद्य, राजानंद सरडे, शंकर चव्हाण, विजय पुराणिक, शिवानंद हत्ते, छबुसिंह बिसेनी, दत्तात्रय जाधव, अप्पा थोटे, शाम धर्माधिकारी, रवींद्र गुठे, अनिल पाटील, किरण पाटील, महावीर पाटील, तुकाराम जाधव, बाबु सुरवसे, दशरथ ठाकुर, गणपत जाधव, माणिक राठोड, श्रीमंत शिंदे युसुफअली खोडील (जमादार),बिरु घोडके, लक्ष्मण गायकवाड, अनिल गंगावणे, राजा बनसोडे राजेंद्र वऱ्हाडे, पार्वती कलशेट्टी, चित्रा भुमकर,सुगंदा पुराणिक रत्नमाला ढोणे व अरविंद जोशी हे त्याकाळातील ३० विद्यार्थी एकत्रीत आले. या विद्यार्थ्यांनी त्यावेळी त्यांना शिकविलेल्या व जे सध्या हयात आहेत त्या शिक्षकांना बोलावुन त्यांचा सत्कार केला. यामध्ये श्री निंगदळी गुरुजी, मोरे गुरुजी, चंद्रकांत कुलकर्णी गुरुजी, शिक्षिका हंसाबाई नागणे या शिक्षकांचा समावेश होता.

 ४४ वर्षानंतर एकत्रीत आलेले विद्यार्थी एकेठिकाणी आले आणि त्याकाळातील त्यांच्या चर्चा रंगल्या असा योग प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडायला हवा. यावेळी विचारांची देवाणघेवाण होण्याबरोबरच आता उतरवायला लागलेल्यामध्ये यामुळे एक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते.


 
Top