तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर शहरात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात तुळजापूर नगर परिषदने पावले उचलली आहेत. त्यानुसार ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या  प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरी बॅग) उत्पादन, विक्री व वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद ने प्लास्टिक बंदीबाबतीत  भवानी रोड आठवडा बाजार येथे मंगळवार दि ५रोजी विशेष मोहीम राबवुन व्यापारी वर्गाकडे असणारे  अविघटनशील  ८६ किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

 ही कार्यवाही  प्रशासक योगेश खरमाटे आणि मा.मुख्यधिकारी अरविंद नातु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत   दत्तात्रय साळूंके,  सुशांत गायकवाड व स्वच्छता विभागातील इतर कर्मचारी  यांचा सहभाग होता.

 
Top