तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतील मदरशा व मज्जीदवरील भोंग्याचा आवाज बंद करा व तुळजापूर खुर्द येथे बांधण्यात आलेल्या सभागृहावर टाकण्यात आलेले मज्जीद नाव हटवण्याची मागणी शिवबाराजे प्रतिष्ठाणने तहसिलदार यांना निवेदन देवून केली. सदर कार्यवाही जलद गतीने करण्यात यावी अन्यथा शिवबाराजे प्रतिष्ठाणच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल , असा इशारा ही देण्यात आला आहे.
निवेदन देताना शिवबाराजे प्रतिष्ठान अर्जुन साळुंके , विकी वाघमारे, नितीन जट्टे, दिनेश कापसे, श्रीकांत सुरवसे सह अन्य हिंदू नागरिक उपस्थित होते.