नळदुर्ग/प्रतिनिधी

संसदीय व सत्याग्रही लोकशाही पुरस्कार आणिआर्थिक समानतेचा अवलंब करून  व्यक्ती स्वातंत्र्य व निधर्म वृत्तीचा अंगीकार करणारे कृतिशील विचारवंत  ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून मराठवाड्यासह देशभरात उभारलेल्या शैक्षणिक व सामाजिक संस्थाच्या जडण घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज वयाच्या ९० व्या वर्षी देखील त्यांच्या हातून होणारे  संघर्षशील कार्य व कृतिशील विचार आजच्या तरुणांना पथदर्शक ठरणारे आहेत असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

 राष्ट्रसेवा दल संचलित ‘आपलं घर’ आयोजित पन्नालाल सुराणा यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि .९ )रोजी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलांनी लिखित “कृतिशील विचारवंत पन्नालाल सुराणा “ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल, पर्यावरण तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक अतुल देऊळगावकर, राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर ,लेखक जेष्ट साहित्यिक शब्बीर मुलानी , उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील ,ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे अध्यक्ष तथामाजी जि .प. सदस्य बाबुराव चव्हाण , अँड. रेवन भोसले, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे , डॉ. शशिकांत अहंकारी ,प्रा. प्रवीण देशमुख ,ज्येष्ठ साहित्यिक दत्ताभाऊ गायकवाड , अभिजीत हेगशेट्टी ,प्रा . आरती बरीदे , आपलं घरचे सचिव गुंडू पवार उपस्थित होते .

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले , साथी पन्नालाल सुराणा यांनी सामाजिक , राजकीय , आर्थिक ,वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले असून शेतकरी , शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी रचनात्मक कार्य केले आहे तेव्हा पन्नालाल सुराणा  म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ असून त्यांचा आदर्श पुढील पिढीने घेणे गरजेचे आहे . त्यांनी सामाजिक न्याय हक्क व लोकशाही समाजवादासाठी  केलेली पायपीट ही मानवतेचे मूल्य आणि माणूसकीचे  विलोभनीय दर्शन घडविणारे कार्य आहे असे पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले .प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पन्नालाल सुराणा यांचा  वाढदिवसानिमित्त सत्कार करून शब्बीर मुलाणी लिखित “कृतिशील विचारवंत पन्नालाल सुराणा “या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .यावेळी बाबुराव चव्हाण , अँड. रेवण भोसले ,भरत लाटकर , डॉ. शशिकांत अहंकारी ,हसन देसाई आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास फुलचंद धोका , प्रा. अशोक सावळे , हसन देसाई , जयचंद सुराणा , प्रकाश शहा , डॉ. दिपा सावळे , अवधूत कुलकर्णी ,इंजिनिअर प्रभास सुराणा , प्रा . अशोक सावळे ,सौ सरिता उपासे ,मुख्याध्यापिका संगीता शहा , संयोजक तथा आपलं घर संस्थेचे सचिव गुंडू पवार ,विलास वकील , आदीं सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आरती  बरीदे यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले .प्रा. डॉ. दीपा सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
Top