नळदुर्ग/प्रतिनिधी

 नळदुर्ग येथील संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजनीमंडळाच्या वतीने शहरांतुन माऊलीची पालखी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचे प्रत्येक चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी पालखी मिरवणुक मार्गावर रांगोळी घालुन व पालखीवर पुष्पवृष्टी करून माऊलीचे दर्शन घेतले.

 या पालखी मिरवणुकीमुळे नळदुर्ग शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पालखी मिरवणुकीची सुरुवात मराठा गल्ली येथील विठ्ठल--रुक्मिणी मंदिरापासुन झाली. ही मिरवणुक पांचपीर चौक,भोई गल्ली, क्रांती चौक, चावडी चौक, बसवेश्वर चौक, भवानी चौक, राममंदिर,सावरकर चौक, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मराठा गल्ली येथील विठ्ठल--रुक्मिणी मंदिराजवळ आल्यानंतर माऊलींची आरती करून मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.

  या पालखी मिरवणुकीत संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळाच्या विमलबाई काळे, सरुबाई महाबोले, सुमन किल्लेदार, सुक्षम माने, अंजली जाधव, शोभा ठाकुर, छायाबाई मुळे, लक्ष्मी किल्लेदार,नीता जाधव, दीपा जाधव, अरविंद माने,नेताजी जाधव, दौलतराव खाटमोडे,मिलिंद भुमकर,मोहित कलकोटे,मोहन डोंगरे यांनी टाळ--मृदंगाच्या गजरात भजन केले.तसेच महिला व पुरुषांनी यावेळी फुगडी खेळली.        

  या पालखी मिरवणुकीत शिवशाही तरुण मंडळाचे पंकज हजारे, सुहास येडगे, बलभिमराव मुळेतानाजी जाधव, शिवाजी सुरवसे, कुरुक्षेत्र किल्लेदार, विलास येडगे, राजेंद्र काळे, सुधीर हजारे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, प्रकाश जाधव, अमोल सुरवसे राहुल गायकवाड, युवराज जगताप,महेश जाधव,बालाजी जाधव, गायकवाड, मनोहर जाधव,अण्णा जाधव, शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, माजी नगरसेवक विनायक अहंकारी,जगन्नाथ जाधव यांच्यासह शिवशाही तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


 
Top