तुळजापूर /प्रतिनिधी

शहरातील पोस्ट आँफिस जवळ दोन अनोळखी महिलांनी वृध्दास हटकुन आमचा लहान मुलगा आजारी असुन त्यास दवाखान्यात दाखल करावयाचे आहे. आमच्या जवळ सोन्याची बोरमाळ असुन ती घ्या व पैसे द्या म्हणून वृध्दाकडुन वीस हजार रुपये घेवुन बनावट बोरमाळ दिली. या संदर्भात फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटना  तुळजापूर शहरात घटली. या प्रकरणी दोन महिला विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 


 
Top