तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गौरीच्या आगमनानिमित्त  ३ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माहेर मंगळागौर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या महोत्सवात मुंबई येथील मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या पथकाद्वारे विविध प्रकारच्या कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्रावणासह गौरी सणाबरोबर माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी बांगड्या वाण, मंगळागौरी, झिम्मा फुगडी ,घागर फुंकणे आदी खेळासह सासू सुनेची गाणी, देवीची गाणी, नृत्य आदिंसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .तरी तेरसह पंचक्रोशीतील महिलांनी माहेर मंगळागौर महोत्सवात सहभागी होऊन मंगळागौर महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.

 
Top