उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा वर्धापनदिन ३ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. त्यानुसार नियोजन व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चेसाठी उस्मानाबादेत रविवारी (दि.२४) पक्षाची जिल्हा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक तालुक्यातून पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते आणण्याचा निर्धार करण्यात आला.

तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांना राज्य महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे, असा ठराव घेण्यात आला. यावेळी संजयकुमार बनसोडे, भागवत शिंदे, आनंद पांडागले, एस. के. चेले, रवी माळाळे, विद्यानंद बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, आनंद पंडागळे, एस. के. चले, महिला आघाडीच्या अस्मिता पारवे, ज्योतीताई लोखंडे, पवार, जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोडे, युवक जिल्हाध्यक्ष रवी माळाळे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव, रोजगार कामगार आघाडीचे डी. के. कांबळे, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, भूम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, अनिल बनसोडे, महादेव भोसले, पांडू झोंबाडे, लक्ष्मण भोसले, संघटन सचिव मुकेश मोठे, कलावंत आघाडीचे श्रीकांत मटकीवाले, दीपक झगडे, पोपट शिंदे, उत्तम ओहाळ, बाबा गायकवाड, मिलिंद सोनवणे, सागर बनसोडे, संजय ओहाळ, दीपक पालके, भारत काळे, विशाल ओहाळ, आकाश इंगळे, जयंद्रथ साबळे, जयश्री राठोड, कविता राठोड, राजश्री पवार, संगीता राठोड, मुक्ता पवार, दिगंबर हावळे, मोनू काळे, सनी धावारे, अनिल पवार उपस्थित होते.

 बैठकीच्या यशस्वितेसाठी सोमनाथ गायकवाड, जिल्हा संघटक संपतराव जानराव, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कटारे, तालुकाध्यक्ष उदयराज बनसोडे, शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, महादेव भोसले, मुकेश मोटे, संघटक सचिव स्वराज जानराव आदींनी परिश्रम घेतले.

 
Top